अंतर्मन { THE INNER HEART }
Aaj 1st September 2011.(GANESH CHATURTHI) Mhantat kuthhlya hi Karyaache Shuruvat Ganeshala vandhan karun karavi.. Tevha Shri Ganeshala vandhan karun, Mi hi aajpasun mazha Antarmaanatil bhavna tumchya Antarmaana parynt pochavnyacha prayatn karat haye... !!Om Ganeshai Namha!!
Saturday, March 8, 2014
Monday, February 24, 2014
Wednesday, November 28, 2012
MI KAVITA KARTO
होय होय मी कविता करतो...!!!!
होय होय मी कविता करतो...!!!!
लोक विचारतात मला, सध्या तू काय करतोस?
मी म्हणतो, मी रोज जगतो, मी रोज मरतो.
माझ्या अनुभवांचा जोरावर , मी हे जग बगतो...
माझ्या सुख-दु:खातील भावना, मी शब्दात व्यक्त करतो...
होय होय मी कविता करतो....!!!!
हो म्हणे कविता करतो, दुसरा प्रश्न लोकांचा हळूच पुढे सरतो,
सांग बर, मग कविता म्हणजे नक्की काय ते????
मी म्हणतो काय सांगू तुम्हाला, कविता म्हणजे नक्की काय ते,,
अहो, कविता म्हणजे असंख्ये सुंदर भावना...
ती एक दैवी आराधना.., एकाद्या प्रियकराची प्रेमळ कल्पना..
एका भक्ताने आपल्या देवकडे केलेली प्राथना...
कोन्हा कलाकारा ने आपल्या कलेसाठी केलेली अथक साधना...
कोणीतरी कोणाला दिलेली प्रेरणा...
कधी मन प्रफुलीत करणारी उतेजना, तर कधी मन सुन्न करणारी संवेदना,
पण खरे सांगू, माझ्यासाठी ती माझ्या मनाने सोसलेली यातना ...
माझ्या अंतरमनातून शब्द रूपात बाहेर आलेली वेदना...
आज-काल माझ्या जखमानवर मी स्वातiच मीठ चोळतो.....
माझ्या असाहायय वेदनांना मी कंठ फोडतो....
होय होय मी कविता करतो....!!!!
वाह , ऐकायला फार छान वाटले रे.., लोक उपहासाने म्हणतात...
नाक त्यांचे मुरडत,, आता तिसरा प्रश्न विचारतात...!!!
पण एक सांगाल का कविराज,
कविता करून येथे मिळते तुला काय ,
पोटा- पाणयाचा विचार बाबा तू काही केला आहेस की नाही??
हो खरे म्हणता तुम्ही, म्हणणे तुमचे पटते,
आणि कविता करून येथे कोणाचेच पोट भरत नसते.....!!
पोटाची खळगी भरण्यासाठी, ईकडे करावे लागते काम,
सकाळ - संध्याकाळ मेहनत करून घाळावा लागतो घाम....
पोटा-पाणा-याचा सोयीसाठी फिरवे लागते वन-वन,
पुराव्या लागतात मनातील सर्व इच्छा, मारावे लागते आपलेच मन.....
अहो सगळ्यांन सारखा येथे मी ही जीवन जगतो,
माझे पोट भरेल एवढ मी ही, नक्कीच कष्ठ करतो....
पण काय सांगू तुम्हाला, पोटाच्या भूखेपेक्षा मन माझे उपाशी,
आणि पोटाच्या भूखचे म्हणाल तर “ काय ओ ”
कधी मिळाले तर खाले तुपाशी, नाही, तर कधी तरी झोपलो उपाशी...!!!!!
होय नाही भरत पोट, आहे मला ठाऊक,
पण कविता करण्यात ही आहे एक वेगळच मIनसिक सुख....
आयुष्यातल्या प्रतेयक सुख- दु:खाचा क्षणांचा हिशोब मी करतो... ..
माझ्या सर्व त्रासांसी , मी बेफीकीर होऊन लढतो ……
बेचैन मन घेऊन माझे,, मी सैरा-वैरा पळतो..... .. तरीही ,
होय होय मी कविता करतो,,,,!!!!!!
एवढ सगळ ऐकल्यावर, लोकांचा धीर आता खचतो,
त्यांचा म्न्नातील इरशेचा काटा आता हळूच त्याना टोचतो...
ते म्हणतात खूप झाले तुझे कविता करणे, जीवन फुकट घालावू नको.. ..
भविष्याचा विचार कर काहीतरी, स्वप्नाच्या दुनियेत राहू नको…..
हसतच म्हणतात ते, टूटतील तुझी सर्व नाती, आयुषाची तुझ्या होईल माती……
शेवटी लोकांचा तो प्रत्येक शब्द माझ्या कानास बोचू लागतो,
माझ्या उघड्या जखमानवर हा त्यांचा तीक्ष्ण शब्दांचा मारा, मोठे घाव घालू लागतो..
आता मन्न माझे दु;खी होऊन, ढसा ढसा रडते...
मला हेच कळत नाही, माझ्या कविता करण्यांने लोकांचे काय नुकसान घडते...!!!!
तुमच्या सर्वच प्रश्नांची उतरे दिली मी, आता तुम्ही माझ्या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या,
मला सांगा कविता करणे पाप आहे का ओ ???
माझ्यासाठी तो एक विरंगुळा आहे, स्वप्ने नाहीच ती, प्रत्येकक्षात भावनांचा तो एक अनमोल साठा
आहे...
माझी कविता तुम्ही वाचावीच असा, माझा कधीच आग्रह नाही....
आणि चुकुन वाचलितच तुम्ही , ती तुम्हाला आवडायलाच हवी अशी ही काही जबरदस्ती नाही....
तुम्ही काही ही म्हणा मर्जी तुमची,,,,,, तुमच्या रागाचा,
तुमच्या द्वेष भावनांचा ही मी सन्मान करतो…..
होय होय मी कविता करतो...
म्हणणे माझे पटणार नाही तरी तुम्हाला सांगतो..
कविता करण्याचे गुपित आज तुमच्या पुढे मांडतो....!!!
अहो प्रत्येक व्यक्तीत असते कुठेतरी एक दडलेले कवी मन्न....
फक्त गरज असते तुम्हाला स्वाताचा मन्नासी प्रामाणिक राहण्याची..
आपल्या अंतर-मन्नातील भावना शब्दात व्यक्त करण्याची.....!!!
कविता कविता म्हणजे तरी काय ओ????
शब्द रूपात व्यक्त होणार्या भावनाच ना ....
पटले तर बघा, तुम्ही ही कविता करत जगा....!!
आयुष्य सुंदर आहे, कल्पकतेने वागा..
.जास्त काही बोललो असिण, तर तुमची क्षमा मागतो...,
आणि
होय होय मी अशीच कविता करतो....
!! ……….. मनिष राणे ……….!!
Labels:
Manish Arts
Location:
Mumbai, Maharashtra, India
Saturday, March 24, 2012
EKAANTE HA
हवीहवीशी माणसं
नकळत दुर निघुन जातात
त्यांच्याशिवाय जगण्याचं
शिकवुन जातात..
आपण ब...सतो...उगाच
रडत...त्या विरहात...
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावुन जातात.
जे आपल्यापासुन दुर गेलेत...
ते कधी आपले नव्हतेच..
जे आहेत सोबत...
तेच आपले हक्काचे..
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत.
जिवाचे जिवलग
मोठ्या नशीबाने मिळतात...
समुद्राचे मौसमी वारे...
फक्त हंगामी असतात..
ते येतात नी निघुनही जातात...
पण जे तुझे हक्काचेअसतात...
ते वादळातही घट्ट धरुन राहातात.
चुक कोणाची..
समजुत कोण घालणार..
सगळेच ताठ मानेचे..
कोण मान झुकवणार.
रथचक्र..आपण...
सारथीही आपणच...
वेगही आपलाच..
अन बंध ही आपलेच..
सारे मनाचे खेळ.
प्रत्येकाचा त्या आयुष्याच्या
रंगमंचावरचा रोल ठरलेला आहे...
तेवढी भुमीका वटल्याशिवाय
जाता येत नाही..
ती भुमीका संपली..की तिथे
राहाताही येत नाही...
बस...हेच सत्य आहे...
शल्य प्रत्येकानेच उरी बाळगलेलं..
एकटेपणाचं विष...ज्याने त्याने...
कोळुन प्यालेलं...
असच एकटेपणी जगाताना...
कधी ना कधी...
ज्याचं त्याचं मन...
एकांतात कोसळलेलं
रडत...त्या विरहात...
ते मात्र आपल्या जगण्यावर
आस लावुन जातात.
जे आपल्यापासुन दुर गेलेत...
ते कधी आपले नव्हतेच..
जे आहेत सोबत...
तेच आपले हक्काचे..
तेच देतील साथ
शेवटच्या क्षणापर्यंत.
जिवाचे जिवलग
मोठ्या नशीबाने मिळतात...
समुद्राचे मौसमी वारे...
फक्त हंगामी असतात..
ते येतात नी निघुनही जातात...
पण जे तुझे हक्काचेअसतात...
ते वादळातही घट्ट धरुन राहातात.
चुक कोणाची..
समजुत कोण घालणार..
सगळेच ताठ मानेचे..
कोण मान झुकवणार.
रथचक्र..आपण...
सारथीही आपणच...
वेगही आपलाच..
अन बंध ही आपलेच..
सारे मनाचे खेळ.
प्रत्येकाचा त्या आयुष्याच्या
रंगमंचावरचा रोल ठरलेला आहे...
तेवढी भुमीका वटल्याशिवाय
जाता येत नाही..
ती भुमीका संपली..की तिथे
राहाताही येत नाही...
बस...हेच सत्य आहे...
शल्य प्रत्येकानेच उरी बाळगलेलं..
एकटेपणाचं विष...ज्याने त्याने...
कोळुन प्यालेलं...
असच एकटेपणी जगाताना...
कधी ना कधी...
ज्याचं त्याचं मन...
एकांतात कोसळलेलं
Subscribe to:
Posts (Atom)