Tuesday, October 4, 2011

SEVHATCHI ICCHA....

@@ माझी एक शेवटची इच्छा आहे @@


माझी एक  शेवटची इच्छा आहे,
माझी अंतयात्रा मला पाहयाची आहे...
पाहयाचे आहे मला,कोण रडते आहे माझ्या मरणावर,
आणि पाहयाचे आहे मला, कोण हसते आहे माझ्या सरणावर..
पाहयाचे आहे मला,"कोण म्हणते अरेरे गेला,"
आणि पाहयाचे आहे मला,"कोण म्हणते बरे झाले मेला !!!!!

आणि हो आणखीन एक इच्छा ऐका माझी,
मला  जाळःणह्यपुरवी वाट पहा तिची..
येईल ती जरूर हे मात्र नक्की आहे,
आणि चुकुन नाहीच आली, तरी स्वर्गात भेट आमची पक्की आहे..
माझ्या तिरडिवर लाऊ नका फुले तुरे,
तिच्या डोळ्यातून निघालेले दोन प्रेमाचे अश्रुच पुरे...

माझ्या मृत्यूवर नका करू कळवळा,
द्वेष तुमच्या मनातला फक्त,माझ्या प्रेताच्या अग्नी मध्ये जाळा..
मला अग्नी देता क्षणी काही ठराविक लोकच  रडणार आहेत,
कारण माझ्या सोबत ,त्यांचे हृदय सुद्धा थोडेसे,का होईना जळणार आहे....

कोण आपले,कोण परके,
नातेवाईक म्हणवतात ते, आणि सघे-सोयेरे,
खरा चेहरा त्यांचा, माझ्या मृत्यूनंतरच मी पाहणार आहे..



माणूस मेल्यानंतरच, त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते..
जीवंतपाणी मात्र त्याची नेहमीच फसवणूक होते...
मी मेल्यानंतरच, माझ्या जगातली सत्ये मला उलगडणार आहे,
मी का जगलो,कसा जगलो???
माझ्या मृत्यूनंतरच आयुषातली न सुटलेली सर्व कोडी सुटणार आहे..,
माझ्या  जगण्याचा खरा अर्थ,
माझ्या मरणा नंतरच मला कळणार आहे!!!!!!
                                                               
                                   - मनिष आर्ट्स...