Thursday, September 1, 2011

NAAT TUTTAH TEVHA...

!!!!! NAAT TUTTAH TEVHA !!!!!!

नात तुटत

तेंव्हा नक्कि काय होत?!


काळजात कुठेतरी खुपत,


वरुन कितीही दाखवल ना..


तरी मन कुठेतरी रडत.


अचानक आकाश भरुन याव एखादेवेळी,


अन् पाऊस पडूच नये.


नुसतच आभाळ भरुन राहव,


आणि मधूनच वीज चमकत राहावी.


तशीच आठवन येऊन जाते,


वेळ कातर होत राहते.


जखम जुनीच असते,


नुकतीच कुठे खपली धरु लागलेली.


पुन्हा नव्याने भळभळू लागते,


चुक कोणाची असते.


किंवा असते की नसते,


ह्याला आता फ़ारसा अर्थ नसतो


अन् हे सगळ आठवून


हताशपणे बघण्यापलिकडे


काहिच उरलेल नसत....
हे अस का व्ह्याव!!!.....

No comments:

Post a Comment